उदय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानमंदिर विद्यासंकुलातील श्री.के.रा.कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली शाळेचा इयत्ता १० वी चा निकाल १००% लागला. शाळेत अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिकतात.अनेक समस्यांना तोंड देत विद्यार्थी शाळा व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी होतात.
शाळेने विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या आहेत. त्यात ई- लर्निंग,सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष व कृतीयुक्त अध्ययन अध्यापन.वेळोवेळी विद्यार्थ्यांना समुपदेशन केले जाते. स्वप्न विधान: "उच्च गुणवततेचा ध्यास व अद्ययावत शैक्षणिक साधनांचा वापर करून शोधक,सकारात्मक,सक्षम बदलास अनुकूल असणारी शाळा"
१० फेब्रुवारी १९७२ हा दिवस लाडशाखीय वाणी समाजातील सात धुरीणींच्या सामाजिक व शैक्षणिक प्रेरणेतून ज्ञानमंदिर विद्यासंकुलाच्या निर्मितीस कारणीभूत ठरला. "विद्या विनयेन शोभते" या ब्रिदाने सुरू झालेली ही शैक्षणिक सेवेची वाटचाल संस्थापकांनी लावलेल्या इवल्याशा रोपाचे वटवृक्ष साकारताना प्रत्येक विश्वस्ताने, मुख्याध्यापिका,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे चालू ठेवली.
निरंतर शिक्षणाचा हा सकारात्मक प्रवाह अगदी तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात यशस्वी झालेल्या या ज्ञानमंदिर विद्यासंकुलाचा सुवर्ण महोत्सव साजरा करतांना अत्यंत आनंद होत आहे.
औद्योगिक शहरात,
मायबोली माझी शाळा |
नाही कोणाशीही वैर,
सर्वांनाच देते लळा ||१||
याच शाळेत वाढले,
हुशार नि गुणवंत |
अस्तित्व राहो शाळेचे,
सदैव अन् अनंत ||२||
हसत खेळत राहो,
सर्व विद्यार्थी नि गुरू |
सुवर्ण महोत्सवाचा
वर्षारंभ झाला सुरू ||३||
सुवर्ण महोत्सवात,
पूर्ण होवो सर्व इच्छा |
पुन्हा एकदा सर्वांना,
मनापासून शुभेच्छा ||४||
- प्रणित पाटील
- १० वी / ब
व्रत विधान:हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी ही शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्यात असणाऱ्या सुप्त गुणांची ओळख व्हावी यासाठी वैविध्यपूर्ण कृतियुक्त उपक्रमांची आखणी करून वातावरण निर्मिती करते. सहशिक्षण देणाऱ्या या शाळेत जीवनमूल्यांसोबतच शारीरिक , मानसिक व भावनिक दृष्ट्या सक्षम , सकारात्मक विचारांची बैठक पक्की असणारा विद्यार्थी घडविण्यावर भर.
'विद्या विनयेन शोभते' या ब्रीदाची सार्थकता प्रत्ययाला येण्यासाठी पुढे येणाऱ्या सर्व शिक्षक , विद्यार्थी, सुविधा दाता यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेचे व प्रयत्नांचे हि शाळा स्वागत करते.ज्ञान, कौशल्य व उपयोजन या घटक प्राप्तीवरच शाळेने आपले लक्ष केंद्रित केले असून उच्च शैक्षणिक गुणवत्ता व देशहित जपणारा विद्यार्थी घडविण्यासाठी शाळा सदैव प्रयत्नशील असते.
"अविद्यं जीवनं शून्यं म्हणजेच विद्ये शिवाय जीवन व्यर्थ आहे."आणि म्हणूनच अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या प्राथमिक गरजांसह शिक्षण ही मुलभूत आणि जगण्याशी निगडीत अशी गरज आहे. हीच गरज ओळखून 1972 साली खालील ज्येष्ठ समाजबांधवांनी एकत्र येऊन उदय शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
Our Result For Academic 2019-2020-This Year One More Feather In Our Cap Our S.S.C. Result Is 100%
89.70
%92.57
%91.17
%245
54.66%
90.60%
87.80%
88.00%
84.83%
81.50%
74.00%
82.50%
80.70%
76.67%
1800
53
17
4
Science Code: MU338SGE Com Code:MU338CGE Aided - Click Here
Commerce Code: MU338CNE Unaided - Click Here